Author Topic: जीवनाचा अर्थ..  (Read 1178 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 503
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
जीवनाचा अर्थ..
« on: January 21, 2013, 07:17:55 PM »
जीवनाचा अर्थ -

1 . जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

2. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.

3. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत
बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत
हसणे उतम !

4. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

5. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

6. मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये.. पण
जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे
तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

7. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू
होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

8. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.

9. जखम करणारा विसरतो पण जखम
ज्याला झाली तो विसरत नाही.

10. आपण पक्षाप्रमाणे आकाशात
उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात
पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे
वागायला शिकलो का ??

                         ....unknown
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: जीवनाचा अर्थ..
« Reply #1 on: January 22, 2013, 10:39:14 AM »
shrikantji khup chan vichar ahet...