Author Topic: ...... दानव झाले देव ......  (Read 623 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
...... दानव झाले देव ......
« on: February 02, 2013, 07:32:09 PM »
...... दानव झाले देव ......

सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे

झोपड्यांची रांग उभारून

त्यास चिरीमिरी घेऊन

पाठींबा देणारा सरकारी अधिकारी

झोपडी दादांचा देव असतो .......

ज्या गरीब माणसांना

बापाची जमीन समजून

झोपडी उभारून सर्व सुविधा देतो

तो सरकारी अधिकारी व झोपडीदादा

गरीबांचा व फुकट्यांचा देव असतो .........

जो पोलीस , कायदे यांना गुंडाळून

पाच पन्नास माणसांना

खाऊन - पिऊन पोसतो

व चुकीच्या कामासाठी त्यांचा वापर करतो

तो मोठा गुंड वा पुढे नेता झालेला

या माणसांचा देव असतो .......

कितीही मोठा गुन्हा केला

तरी कायद्याचा आधार घेऊन

जो वकील बुद्धीच्या जोरावर व

पैशाने न्याय विकत घेऊन

त्याला सहीसलामत सोडवतो

तो वकील अन न्यायाधीश

गुन्हेगारासाठी देवच असतो .......

जो सत्यासाठी झगडतो

अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो

तो काही काळापुरता

समाजासाठी देव असतो

पण तो कायमचा

या सर्वांसाठी दानव असतो

या देवांकडे सगळी सत्ता

अन प्रचंड ताकद असल्याने

हा दानव एक दिवस संपून जातो

झालंच काही तर त्याचा एखादा पुतळा होतो

आणि वर्षातला एक दिवस थोड्या वेळासाठी

त्याचा स्मृतिदिन साजरा होतो .

                                             संजय एम निकुंभ , वसई

                                         दि. ०१.०२.२०१३ वेळ : ११.३० दु .

                   http://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hlMarathi Kavita : मराठी कविता