Author Topic: तो आणि ती .  (Read 757 times)

Offline Shashi Dambhare

  • Newbie
  • *
  • Posts: 10
तो आणि ती .
« on: February 15, 2013, 12:51:12 PM »
तो आणि ती .

तो उत्कट , उत्सुक, अनावर .... तिच्या प्रेमात
तिचा वावर शांत शांत ......
त्याच्या मनभर " ती " चा उच्छाद ,
ती " त्या " च्या असण्यानेच निवांत ......!
तो शुक्र , ती पृथ्वी
तो पाउस, ती तृषार्त ,
त्याला बरसण्याची घाई
तिला अपेक्षीत ' झिरप ' अविश्रांत ....!
तो आक्रस्ताळी , ती भयभीत
तो ओसंडून ...ती मीत
त्याची धुसफूस ....तिला फक्त ओल,
तो उथळ उथळ ...वर वर
ती आत आत ...खोल खोल ......!

शशी .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तो आणि ती .
« Reply #1 on: February 15, 2013, 01:37:55 PM »
ekadam mast kavita... manaapasun avadali! :)