Author Topic: तू मला हवी आहेस  (Read 822 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू मला हवी आहेस
« on: February 16, 2013, 08:11:25 PM »
तू मला हवी आहेस

.............................

वाटतं कधी

ढगास  चिरून 

धावत धावत यावं

तुला भेटण्यासाठी .........

वाटतं कधी

नभास चिरून

उडत यावं

तुला पाहण्यासाठी .......

किती अधीर झालोय

तुला कसं सांगू

तुझ्या मायेच्या

एका स्पर्शासाठी

नाही जीव रमत

या धरतीवर

काळीज जळत गं

तुला बघण्यासाठी ..........

वाटतं कधी

मृत्यूने

मलाही मिठीत घ्यावं

तू असशील तेथे

नेऊन सोडावं ........

पुन्हा तुझ्या मायेचा

स्पर्श फिरेल डोक्यावरून 

पुन्हा ती ऊब मिळेल

प्रेमाची तुझ्याकडून

कारण तुझ्या प्रेमाची सर

कुठल्याही नात्याला नाही

म्हणून प्रत्येक क्षण

मला आठवत राहते आई .

                                       संजय एम निकुंभ , वसई

                                  दि. १६.०२.२०१३ वेळ : ७.३० संध्या .

 Marathi Kavita : मराठी कविता