Author Topic: आपलाही मूड कधी  (Read 797 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
आपलाही मूड कधी
« on: February 19, 2013, 11:57:53 PM »
आपलाही मूड कधी
अगदी मस्त असतो
शर्टवर आपणही
छानसा सेंट मारतो .१
कुणी वळून पाहतो
कुणी ओरडून जातो
आपण मुळी ढुंकून
कुणा पाहत नसतो .२
आपल्या एका मस्तीत
उगाच शिळ घालत
ये ती वाट तुडवत
जातो उनाड चालत .३
असते कधी नसते
याला काही कारण
अगदी खुश असतो
जीवनावर आपण .४
कुठलीशी आठवण
कुठलेसे एक स्वप्न
कुठली छान कविता
गुंजत असते गाण .५
अवघा प्रकाश येतो
कणाकणात दाटून
मग गातो मोठ्यानं
स्वत:साठीच आपण .६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आपलाही मूड कधी
« Reply #1 on: February 20, 2013, 11:01:34 AM »
ek mast divas :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: आपलाही मूड कधी
« Reply #2 on: February 21, 2013, 02:23:31 PM »
true......thanks