Author Topic: पहाट कोणाची  (Read 717 times)

Offline kumudini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 118
पहाट कोणाची
« on: February 24, 2013, 10:30:56 AM »
पहाट कोणाची
- कुमुदिनी काळीकर

चिवचिवणाऱ्या चिमण्यांची
बागडणाऱ्या पक्ष्याची
सळसळत्या पानातून गंधार
घुमविणाऱ्या वाऱ्याची १

झुळझुळणाऱ्या सारितांची
दरवळणाऱ्या कमळांची
लाल गुलाबी शालू नेसून
नटलेल्या प्राचीची  २

सुरातल्या भूपालीची
जात्यावरच्या ओवीची
गाई वासरा साद घालीत्या
श्रीकृष्णाच्या वेणूची ३

तिमिराच्या अस्ताची
दिसास उजळायाची
रवि किरणांनी हळूच येऊन
अवनीस जागे करण्याची   ४

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Raju sakhare

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: पहाट कोणाची
« Reply #1 on: February 24, 2013, 07:56:08 PM »
Veryyyy Niceeee!!!!!!!

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: पहाट कोणाची
« Reply #2 on: February 25, 2013, 10:11:39 PM »
chan aahe kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पहाट कोणाची
« Reply #3 on: February 26, 2013, 01:03:25 PM »
chan!