Author Topic: वागणूक ..................  (Read 1733 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
वागणूक ..................
« on: February 27, 2013, 06:57:38 AM »
वागणूक ..................वागणूक हीच माणसाच्या

मनाचा आरसा असते

तीच त्याची स्वतःची

खरी ओळख असतेकुणी कसा वागतो

यावर त्याचं मन कळत

कुणाचा स्वभाव कसा

हे वागण्यनचं कळतमाणूस म्हटला म्हणजे

तो भिन्न असणारच

हाताची बोटे जशी

तसा वेगळा असणारचमाणूस तसा कधीच

वाईट असा नसतो

पण त्याची वृत्ती कशी

याला खूप अर्थ असतोज्याला म्हणतो आपण वाईट

त्याला तो चांगलाच वाटतो

आपण चुकीचं वागतोय

हे तो मानतच नसतोमुळात चुकीचं काय अन वाईट काय

हे त्याला कधीच कळत नाही

कारण मनाच्या आरशात तो

कधीच डोकावत बसत नाहीम्हणून तर चित्र - विचित्र स्वभावाचे

माणसं नजरेस पडत असतात

ते कसेही वागले तरी

आपल्याच धुंदीत जगत असतातमला वाटतं आपल्या वागणुकीशी

समाज , धर्म जोडलेला असतो

आपल्या एका वागण्याने

तो हि बदनाम होत असतोम्हणून आपल्यातले दोष प्रत्येकाने

मनाच्या आरशात पाहून घ्यावे

कुणाच्याही मनात घर करू शकेल

असे आपले वागणे असावेद्वेष , मत्सर सारे विसरून

धर्मासशी बाजूस ठेवावे

माणूस धर्म पाळून सर्वांनी 

हृदयात माणसाच्या घर करावे .                                             कवी : संजय एम निकुंभ , वसई

                                             दि. २७.०२.२०१३ वेळ : ६.२० स.

                                                
« Last Edit: April 18, 2014, 12:22:54 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता