Author Topic: सागरास २६/११ च्या पार्श्वंभूमीवर  (Read 484 times)

Offline kumudini

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
सागरास २६/११ च्या पार्श्वंभूमीवर
कुमुदिनी काळीकर


सांगरे सागरा
बोल रे अर्णवा
आणिले वाहूनी
काय तू शत्रूला
अस्तित्व हे तुझे
अगस्तीच्यामुळे
हेही तू भुललास का
प्राशूनी एका क्षणी
दावूनिया दया
उःशापिले होते तुला
अपराध तू केला असा
ना क्षमा माफी तया
होऊनी अगस्ती कुणी
दंडील रे तुला
जाणीता ना उपकार तू
होतोस कृतघ्न तू
का तुझ्याही मनी
माणूस संचारला

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
chan kalpana...