Author Topic: समृद्धी कडून दुष्काळाकडे  (Read 490 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
लंकेत म्हणती 
   सोन्याच्या विटा आहेत
प्रत्यक्षात मात्र त्या
  कधींच पाहिल्या नाहींत ।
सरकार  म्हणती 
   रामराज्य आणले
अन्न धान्य कपडा
   सारे गायब झाले ।
खायला अन्न नाहीं
   प्यायला पाणी नाही
नेसायला वस्त्र नाहीं 
  प्रकाशासाठी वीजही नाहीं ।
तरी म्हणती हे नेते   
   आम्ही गरीबांचे वाली
जनतेसाठीच आम्ही
   आमची जीवने वाहिली ।
वाटते विचारावे त्यांना
   खटाटोप हा कां करता
कां आमच्या साठी तुम्ही
   व्यर्थ असे झिजतां ।
     ह्या मागे दडलेले
   सत्य हे वेगळेच आहे
जनता हिता मागे
   फक्त सतेंची हांव आहे ।
सत्तेवर आल्यावर
   जनतेची पर्वा नाही
कितीही हडपले तरी
  त्यांची भूक भागत नाही ।
सत्ता हाती आल्यामुळे
   एकच गोष्ट झाली
पुत्र ,आप्त, जांवई  ह्यांची
    मात्र पोळी पिकली ।
ह्यांच्या बँका आणि पोटे 
   दिवसेदिवस फुगता आहे
जनता मात्र भुकेमुळे
   रोडावत चालली आहे ।
समृद्धी कडून दुष्काळाकडे
   आजचे नेते नेत आहेत ।
ह्या देशाची  स्वार्थी नेते
  फक्त दुर्गती करत आहेत।।   
                    रविंद्र बेन्द्रे     

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this                                                
http://www.kaviravi.com/2013/02/social-poemread-by-suman-bendrey.html