Author Topic: जे.कृष्णमूर्ती,पाडगावकर, कविता  (Read 575 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
“ कळले का ,
मी म्हटले होते ते ?
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!”
मी पाडगावकरही 
ठेवून दिले.
कारण,
अचानक मला
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 01:20:02 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...