Author Topic: ग़झंल - मोरपंखी  (Read 528 times)

Offline satish-Aman

  • Newbie
  • *
  • Posts: 9
ग़झंल - मोरपंखी
« on: March 20, 2013, 10:32:28 AM »
हरवले ते गवसले पुस्तकातील मोरपंखात ,
सूर माझिये स्वछद गायले केवड्याच्या बनात .

सर्व जन पुढे पुढे गेले वेशी ओलाडूनी ,
मी मात्र राहिलो मुक्या दगडाच्या अमलात .

बघ जरा कधी तरी वळून उजाडल्यावर ,
कसे राहिले चांदण्याचे हुंदकें तुझ्या वचनात .

डोळ्यात दिसली आज मज भिजलेली माणसे फार ,
भास होता एक आज सुखांचा आसवाच्या आरश्यात .

कोऱ्या कागदावर काही अनोळखी क्षण गिरवीत राहिलो ,
अनोळखी ह्या जगात गुंतलो मी ओळखीच्या शब्दात

Marathi Kavita : मराठी कविता