Author Topic: सोलापूर  (Read 745 times)

Offline swatium

  • Newbie
  • *
  • Posts: 34
सोलापूर
« on: March 25, 2013, 10:52:34 PM »
सोलापूर
 
चंद्ररस प्राशन  करुन
माझ्याशी हितगुज करणाऱ्या
चांदण  माखल्या रुपेरी लाटा
वार्यावर झुलणार्या नारळाच्या झावळ्या
मंद धुंद गारवा
भविष्याच्या सुंदर स्वप्नांचा
गोफ विणणारी रात्र
मस्त शांत झोप
पहाटे  जाग येताच समोर
संथ शांत जलाशय
सूर्य किरणांशी
पाठशिवणीचा
खेळ खेळणाऱ्या
सोनेरी अवखळ लाटा
 पावसाळ्यात
कधी थेंब थेंबानि तृप्त होणार्या
तर कधी उत्फुल्ल उत्कटतेन
उसळून निघणार्या वेड्या लाटा
खरच त्या तळ्याशी ..त्या लाटांशी
एक वेगळेच नाते जडले होते
आणि हो
त्या लाटांवरून पलीकडून
माझ्यापर्यंत येणारेदैवी भावाचे  निर्माते
भक्तिमय सूर
'येळय्या   येळय्या   सिद्धुराया ....'
अन अलीकडे
बाप्पाच्या दर्शनाला
गणपतीघाटावर अनवाणी जाणारी
भाविकांची पाऊले
अशी प्रसन्न सकाळ
आणि
आजीच्या हातचा वाफाळलेला चहा
हे केवळ सोलापुरलाच असू शकते
फक्त सोलापुरलाच ..आणि
आता तर स्वप्नातच ...
...........................स्वाती मेहेंदळे 
     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सोलापूर
« Reply #1 on: March 27, 2013, 04:01:57 PM »
chan kavita

SameenaShaikh

  • Guest
Re: सोलापूर
« Reply #2 on: March 30, 2013, 02:04:23 PM »
hi swati!!!
sameena here....
nice poetry.....