Author Topic: मराठी ग़झंल - मुक्त  (Read 662 times)

Offline satish-Aman

  • Newbie
  • *
  • Posts: 9
मराठी ग़झंल - मुक्त
« on: April 04, 2013, 03:37:40 PM »
तू ये कधीतरी माझे जीवन, मुक्त  करण्यासाठी,
मनी रुजलेल्या तुझ्या  स्मृती, घेऊन जाण्यासाठी .

हे कोणी दिले दान मज, चंद्र तारकांचे आंदण ,
मन माझे मंदपणे जळते, राहिलेल्या क्षणांसाठी .

असेल मी नसेल मी,  तुझियाभोवती भास होवून ,
येतील तुझियाहि नयनात, कधीतरी अश्रु माझ्यासाठी .

सुर्य निघेल आता परत, माझ्या सुन्या आभाळातुन ,
घेईन  मी जन्म परत, तुला एकदा भेटण्यासाठी .

ठेव थोडे अश्रू लपवुन,  डोळयात तुझ्या ,
लागतील तुला आठवणींचा, धुर विझवण्यासाठी .

शब्दांना शब्दांचा खेळ,  नाही समजला ,
मी पुन्हा सोडला डाव , पुन्हा एकदा  हरण्यासाठी .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मराठी ग़झंल - मुक्त
« Reply #1 on: April 05, 2013, 11:22:46 AM »
kya bat.... khup chan