Author Topic: आई…  (Read 1090 times)

आई…
« on: April 05, 2013, 08:56:03 AM »
आईची मुलं हळू हळू मोठी होतात… स्वतः आई बाबा बनतात… लेक तिच्या सासरी संसारात गुंतलेली असते तर चिरंजीव आपल्या मुला बाळामध्ये रमलेले असतात… आईलाही हे काही नवीन नसतं…. आणि आईवरच प्रेमही कधी कमी झालेलं असत असही नाही… पण कुठेतरी आईसाठी एखादा दिवस काढावासा वाटतो… तिच्यासोबत एक रम्य संध्याकाळ घालवाविशी वाटते…. बघू कधी जमतंय… :)

सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हटलं…
कि पहिल्यांदा आठवते ती आई…
पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात…
बघ जरा… आई कुठे हरवली तर नाही… ?

पाहिलंय का कधी तिच्या… त्या दोन निस्वार्थी डोळ्यांत…
कुरवाळलेत का कधी… तिचे सुरकुतलेले हात…
जाणवलीये का कधी वाढलेली … तिच्या आवाजातली थरथर …
घातलीये कधी नेहमीप्रमाणे विसरलेली… रात्री चादर तिच्या अंगावर… ?

खटकलीये का कधी तिच्या… दातांची उठणारी पंगत… ?
हल्ली सगळीच काम होतात तिची… थोडी थांबत थांबत…
चमकलाय कधी डोळ्यासमोर… तिच्या केसांतला वाढता पांढरेपणा…
काही सांगून गेलाय का… तिचा किंचित वाकलेला कणा…?

आठवतंय कधी नेली होती…तिच्यासाठी तिची आवडती भेळ…
कधी खेळला होतास निवांत बसून… तोच जुना ५-३-२ चा खेळ…
कधी बर दाबली होतीस… तिची रोजचीच दुखरी कंबर…
गेल्याच आठवड्यात वाढलाय… तिच्या चष्म्याचा नंबर….

अगदी आजही आवडते ना…  तिच्या हातच्या मेथीची टेस्ट…
का बर कोणी न्हवतं सोबत… जेव्हा होती तिची मोठी MR ची टेस्ट… :(
भरलीये कधी Vaselline ने… तिच्या टाचेतली ती खोल भेग…
दिवसेंदिवस वाढत चाललीये… तिच्या चेहऱ्यावर एक एक रेघ…

कधी मारली होती आठवतंय… तिला धावत जाऊन घट्ट मिठी… ?
हात हातात घेऊन चालला होतास… बाजूला ठेऊन तिची ती काठी…. ?
Account मध्ये Transfer न करता… कधी ठेवलेत पैसे स्वतः तिच्या हातात….
फक्त एखादीच नोट काढून घेईल… उरलेले ठेवेल पुन्हा तुझ्याच खिशात….

ऑफिसमधून जरा लवकर जाऊन…
आज आईला एकदा भेटून बघ….
आजची एक छान संध्याकाळ…
तुझ्या प्रिय आईसाठी जग…. :)

-  टिंग्याची आई (Shailja)

Marathi Kavita : मराठी कविता

आई…
« on: April 05, 2013, 08:56:03 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,415
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आई…
« Reply #1 on: April 05, 2013, 02:10:46 PM »

टिंग्याची आई (Shailja)!
खूपच छान कविता आहे!
अशीच एक कविता खास आपल्यासाठी!
बघा तुम्हाला आवडते का?

आई!

सखा तुझा
अधांतरीच तुला
सोडून गेला!
वाटलं प्रवास आता
संपला तुझा!

पण न खचता
खेळलीस तू;
आयुष्याची
एक झुंजार खेळी!

अशातच
प्रवास तुझा कधी थांबला;
तुला कधी कळलेच नाही!

आता शब्द तुझी गोठलीत;
आसवहि थिजलित!
पण नजर तुझी
सदैव भिरभिरती!

घरट्यातली  पाखरें;
केंव्हाच गगनभैर झाली;
कधीही न परतण्यासाठी!
पण तरीही;
नजर तुझी
सदैव भिरभिरती!
कुणास ठाऊक?
कुणासाठी?
कशासाठी?

आई सांग  मज
आजच्या दिवशी;
वाहू कसा मी;
तुज श्रद्धांजली!
आठवणींचा पाऊस
पापण्यांपलीकडेच आटवू;
कि ढसा - ढसा
रडूं मी!

मिलिंद कुंभारे

Re: आई…
« Reply #2 on: April 05, 2013, 04:38:50 PM »
khup khup Abhari ahe Milind.... :) ek navin vishay suchvlat kavitesathi... :) baghu kadhi jamtay lihayla..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):