Author Topic: मन आणि काळ ...  (Read 705 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
मन आणि काळ ...
« on: April 16, 2013, 01:15:49 AM »
मन आणि काळ ...

मन आणि काळ
   ह्यांचे प्रमाण व्यस्त आहे
मन मागें मागें
   तर काल पुढे जात आहे । 
आशा आणि काळ
   ह्यांचे प्रमाण सम आहे
आशेच्या भ्ररारी संगे
   काळही पुढे धावत आहे ।
गणिताचे हे रूप
   पुढे बदलले जात आहे
जीवनांतील प्रसंगाने
   त्याचे सत्य पटत आहे ।
मन पुढे जाऊन
   आशा मागे रहात आहे
काळ मात्र नेहमी
    पुढे पुढेच जात आहे ।।
                       रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
 Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/miscellaneous.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मन आणि काळ ...
« Reply #1 on: April 16, 2013, 02:16:49 PM »
छान! :) :) :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मन आणि काळ ...
« Reply #2 on: April 16, 2013, 05:26:50 PM »
manacha ani kalacha yogayog chaan julaun anlay...