Author Topic: भावना आणि व्यवहार  (Read 665 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
भावना आणि व्यवहार
« on: April 25, 2013, 11:00:24 PM »
भावना आणि व्यवहार
ह्यांची सांगड जमत नाहीं
भावनांच्या आधाराने
जगांत जगता येत नाहीं।

भावना असते मनांत
ती दाखविता येत नाहीं
व्यवहार स्पष्ट दिसतो म्हणून
त्यास डावलता येत नाहीं।

भावना संगे वहात जाऊन
मी व्यवहार पाहिला नाहीं
म्हणूनच लोक म्हणतात
जगण्यास हा लायक नाहीं ।।

रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/miscellaneous_25.html
« Last Edit: April 25, 2013, 11:02:49 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता