Author Topic: ओझं  (Read 637 times)

Offline swatium

  • Newbie
  • *
  • Posts: 34
ओझं
« on: April 30, 2013, 11:13:39 PM »
विरले भोवरे शमल्या वादळात
मनसागरात निजल्या खवळल्या लाटा
लक्ष,अब्ज … शांत स्तब्ध ,
गुंडाळले बासनात भूतकाळाच्या
तत्व हट्ट , सारे ,
जगासमोर वाघ झालं
काळीज माझं
मात्र … ते
तुझ्या डोळ्यात वितळलं
मऊ ,हळव्या लोण्यागत भाबडं
सरलं मीपण सारं
पण आता
माझेच कलेवर माझ्याच खांद्यावर
ओझं झालं !
……………स्वाती मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: ओझं
« Reply #1 on: May 01, 2013, 03:31:11 PM »
माझेच कलेवर माझ्याच खांद्यावर
ओझं झालं

chan ahet vakya rachana