Author Topic: आज तरी तू....  (Read 726 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
आज तरी तू....
« on: May 03, 2013, 03:44:41 PM »
आज तरी तू मला साद देशील ना…?
कोंदटलेल्या श्वासांना स्पर्श तुझा करशील ना…?
वाट पाहून सखे मी झुरतो सदा मनी
आता तरी उदार होऊन,
अश्रू माझे पिशील ना… ?
हरलोय मी आता….
झालोय पोरका तुझावीना ,
एकदातरी हृदयाला तुझ्या 
मला बिलगवून घेशील ना … ?
मृगजळाकडे आकर्षलो अन
घरचा चंद्र विसरलो गं  मी … 
एखादी तरी रात्र मला तुझ्या
कुशीत घेशील ना… ?
अंतकळा दाराशी उभीय सखे 
कणाकणाने संपतोय मी ,
खरच नाही राहवत आता….
उघड्या डोळ्यांना मुक्ती तरी देशील ना…?
                                           
                                             - रुद्र   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आज तरी तू....
« Reply #1 on: May 04, 2013, 04:03:26 PM »
छान!

 :) :) :)