Author Topic: असं होतं कधी कधी --------------------------------  (Read 752 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
असं होतं कधी कधी
--------------------------------
कुणाशीतरी
बोलण्यासाठी
आतुर झालेलं मन
फोन करतं तेव्हा
आता रेंज नाही
वा फोन बंद असल्याचा
मेसेज येत रहातो
पुन्हा मन तडफडत
पुन्हा ते धडपडत
अधीरता अगदी
शिगेला पोहोचलेली असते
अन फोन लागतो
पलीकडचा आवाज ऐकताच
कायं बोलावं तेच सुचत नाही
त्याचवेळेस मनातले सारे
शब्द कसे विरून जातात
खूप बोलायचं असतांनाही
अधर गप्प होऊन जातात
पण क्षणभर कानावर पडलेला
तो आवाज
खूप काही देऊन जातो
आपलं आवडतं माणूस भेटल्याच
सुख ओंजळीत टाकून जातो
जरी मोजकेच क्षण बोलता आले तरी
तो आवाज मनाला
आनंदाच्या झुल्यावर झुलवत राहतो .

संजय एम निकुंभ , वसई
दि . ६.५.१३ वेळ : ६. ३० संध्या .