Author Topic: पण तरीही वाट बघणे आहेच  (Read 746 times)

Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male


वर भरून आलेले ढग
खाली रापलेली पायवाट.
खात्री आहे तो आजही बरसणार नाही
पण तरीही वाट बघणे आहेच.

कर्जाचा बोजा डोक्यावर
कापड नाही अंगावर
बसलाय भर उन्हात, हात आहे कपाळावर.
नजर आहे शांत, आहे आशेची काजळ
आज तर आभाळही नाही त्याच्याबरोबर
पण तरीही वाट बघणे आहेच.

बायका, पोरे आहेत उपाशी
सरकार खाते नेहमीच तुपाशी
हातात असस्ते वैरणीची दोरी
काळजी पेक्षा आत्महत्याच बरी
पण तरीही वाट बघणे आहेच.
                       
                               मंदार
Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: पण तरीही वाट बघणे आहेच
« Reply #1 on: May 13, 2013, 10:21:19 AM »
vastva varnan