Author Topic: लाह्या  (Read 419 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
लाह्या
« on: May 13, 2013, 11:55:41 PM »
लाह्या

खूप हसावं
खूप रडावं
फुलणाऱ्या लाह्यानसारखं
आगीनं  होरपळत
धगीनं फुलत
तरी
सुंदर दिसत
सुंदर हसत
कधी
अंधाऱ्या  गाभार्यात तेवणार्या
मंद स्निग्ध ज्योतीसारखं
अंतरातल्या गाभार्यात वेदनेला
तेवत ठेवावं
आणि
हसरं दुखरंआयुष्य
सुखा  समाधानानं
आल्हाद जगावं  …!

……स्वाती मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: लाह्या
« Reply #1 on: May 14, 2013, 09:58:30 AM »
bharich..... :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: लाह्या
« Reply #2 on: May 14, 2013, 12:04:51 PM »
खूप हसावं
खूप रडावं
फुलणाऱ्या लाह्यानसारखं

chan!! :)