Author Topic: त्याचं वागणं  (Read 618 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
त्याचं वागणं
« on: May 29, 2013, 01:54:26 PM »
आज सकाळी अचानकपणे
तो आला अन बरसून गेला
ओल्या खुणा ठेऊन मागे
प्यास तिची वाढवून गेला

रोज आता तो असंच करेल
बघणार नाही काळ वेळ
वाट त्याची बघायला लावेल
अतृप्ती तिची अशीच वाढवेल

त्याच्या अशा वागण्यानी
अतृप्त ठेवेल तो रोज तिला
मुसळधार कोसळून मग एक दिवस 
…….पाउस तृप करेल..…..धरणीला

(आज सकाळी आमच्या पनवेल मध्ये अचानक पाचच मिनिटंरिमझिम झाली आणि वातावरण एकदम आल्हादायक झालं. त्या क्षणी सुचलेल्या ओळी आहेत ह्या......)केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: त्याचं वागणं
« Reply #1 on: May 29, 2013, 02:17:15 PM »
mast .perfect

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: त्याचं वागणं
« Reply #2 on: May 29, 2013, 10:09:51 PM »
भारीच .... :)