Author Topic: भावना  (Read 690 times)

Offline kumudini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 118
भावना
« on: May 31, 2013, 03:05:00 PM »
 
भावनांची आर्तता शुष्क शब्दा येईल का
भावनांचा आवेग हा शब्दी बंदी होईल का
शब्द हे बापुडे भावना ऐश्वर्य शाली
या मनीच्य लाटास बांधी
तो किनारा गवसेल का
भावनांच्या आवर्तनांना
सूर कधी लाभेल का
वठलेल्या वेलीपरी
गोठून त्या जातील का
आवर्ती या चिंतनाच्य
गटांगळ्या घेत असता
दूरवरी पसरून हात
ठाकला होता सखा
कुमुदिनी काळी कर


Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: भावना
« Reply #1 on: May 31, 2013, 11:19:24 PM »
छान जमली आहे कविता.... :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: भावना
« Reply #2 on: June 05, 2013, 10:36:17 PM »
Mastach

भावनांची आर्तता शुष्क शब्दा येईल का
भावनांचा आवेग हा शब्दी बंदी होईल का
शब्द हे बापुडे भावना ऐश्वर्य शाली
या मनीच्य लाटास बांधी
तो किनारा गवसेल का
भावनांच्या आवर्तनांना
सूर कधी लाभेल का
वठलेल्या वेलीपरी
गोठून त्या जातील का