Author Topic: घर  (Read 600 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
घर
« on: June 01, 2013, 05:19:21 PM »
घर

घराच्या चार भिंती

त्यात असावी आपुलकीची नाती

स्वार्थ, कलह न रुजावा

प्रेम , जिव्हाळा तिथे नांदावा

एकमेकांचा आदर करावा

वयाप्रमाणे मान द्यावा

उणे दुणे  तिथे नसावे 

देणे घेणे मनी रुजावे

विवेके कर्म करावे

संस्काराचे बीज रुजावे

गर्व नसावा श्रीमंतीचा

धर्म पाळावा सदाचरणाचा

घर म्हणजे  वास्तु

म्हणते ती तथास्तु

                            सौ . अनिता फणसळकर   

Marathi Kavita : मराठी कविता