Author Topic: पाऊस  (Read 579 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
पाऊस
« on: June 04, 2013, 01:38:06 PM »
पाऊस

पाऊस पहिला
सुखावून गेला
साद हळूच
घालून गेला
सखी कवितेला
मागोव्यात ….
अशरीरी आनंदाच्या
मन दूर अज्ञातात
दु :खं यातना
ऐहिक भोग सारे
पुसून गेले पावसात
भिजली माती
भिजली मती
दिगंतातून गवसले
सूर भिजले
इंद्रधनुच्या मांडवात
लगीन लागले
धरती आणि सूर्याचे
अक्षत गारांची
वेचीत मी सुखावले !

……स्वति मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाऊस
« Reply #1 on: June 04, 2013, 02:31:59 PM »
इंद्रधनुच्या मांडवात
लगीन लागले
धरती आणि सूर्याचे
अक्षत गारांची
वेचीत मी सुखावले !
 
va va

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: पाऊस
« Reply #2 on: June 04, 2013, 03:13:16 PM »
NICE ONE ......