Author Topic: लिव इन रिलेशनशिप  (Read 784 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
लिव इन रिलेशनशिप
« on: June 12, 2013, 07:23:26 AM »
लिव इन रिलेशनशिप
-------------------------------
[ जिया खानच्या आत्महत्येवरून ]
-----------------------------------------
बिपाशा असो वा जिया
लिव इन रिलेशनशिप
फक्त एक फॅड आहे
आतातरी नव्या पिढीने या नात्यात गुंतू नये असे मला वाटते …….

कितीही वर्षे एकत्र घालवले तरी
कुठलेच बंधन या नात्यास नाही
एकत्र राहू शकू जीवनभर
हे कुणावरही बंधन नाही
फक्त लग्न न करताच मजा मारण्याची
यात चांगली सोय आहे
एकाच मन भरल्यावर
त्याला त्याची वाट पूर्ण मोकळी आहे
लिव इन रिलेशनशिप
हे एक पोकळ नातं आहे
शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचं
ते फक्त एक माध्यम आहे
बिपाशा अन जॉन दहा वर्षे एकत्र राहूनही
एकमेकांचे मन ओळखू शकले नाही
इतके वर्षे एकमेकांना भोगून
हाती काहीच लागले नाही
यात सर्वात जास्त मुलीनंचच
शोषण होत रहात असतं
गर्भार पणाच्या गुंत्यातून
त्याचं शरीर सुटत नसतं
सतत गर्भार पणाची भीती बाळगून
त्यांचं जगणं त्रासदायक होतं
गर्भपात करून करून
स्वता:च्या शरीर अन मनाचं नुकसान होत असतं
पण मुलीहि अशा नात्यास स्वतःहून तयार होतात
शरीर आकर्षणांलाच प्रेम समजून बसतात
नातं विस्कटून गेल्यावर बलात्काराचे आरोप करतात
सर्वस्व लुटून गेल्यावर स्वप्नातून जागे होतात
असं तकलादू नातं हातून निसटल्यावर
नैराश्यान मन पूर्ण घेरून जातं
जगणं नकोस वाटून
आत्म हत्येस प्रवृत्त होतं
म्हणून हे नातं स्वीकारतांना
मुलींनी तर हज्जारदा विचार करावा
लग्ना नंतरच शरीर संबंधाचा मार्ग
मोकळ्या मनाने अवलंबवावा
प्रेम कधीच असत नाही
फक्त शारीरिक आकर्षण
हे ज्याला उमगल त्यालाच
खरे कळलेय जीवन .

संजय एम निकुंभ , वसई
दि. ११ . ६ . १३ वेळ : ३.०० दु.

Marathi Kavita : मराठी कविता

लिव इन रिलेशनशिप
« on: June 12, 2013, 07:23:26 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 312
Re: लिव इन रिलेशनशिप
« Reply #1 on: June 12, 2013, 08:11:12 AM »
    छान, नव्या पिढीस छानसंदेश देणारी
आज आपल्या दोन कविता वाचल्या __मनात काही विचार उमटले ते
  "स्त्री मन "ह्याकावितेच्या रुपात पोस्ट करत आहे

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: लिव इन रिलेशनशिप
« Reply #2 on: June 12, 2013, 12:53:17 PM »
mitra kavitecha ashayatun shiknyasarkha barach kahi aahe....
pan kavitet pratyakshyat konachahi nav namud karta yet nahi....
mhanun tya navan aivaji totaya etar vapar karava...
jenekarun vaad nirman honar nahi....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: लिव इन रिलेशनशिप
« Reply #3 on: June 12, 2013, 03:08:01 PM »
छान, :( :( :(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):