Author Topic: पान  (Read 956 times)

Offline aap

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
पान
« on: June 24, 2013, 02:22:19 PM »
पान

पाना पानात गुपित दडले हो पाना पानात

आंब्याचे पान तोरणाची शान शुभ कार्याचा मान

बेलाचे पान शंकराला मान

तुळशीचे पान विष्णुपदी स्थान

रुईचे पान मारुतीची शान

केवड्याचे पान नागाचे स्थान

मेंदीचे पान शकुनाचा मान

केळीचे पान भोजनासी छान

वडाचे पान द्रोण पत्रावळी छान

नागवेलीचे पान विड्यासाठी छान

पिंपळाचे पान सळसळ छान

आपट्याचे पान त्याला सुवर्णाचा मान

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे आणि सोय  रे

                                 सौ . अनिता फणसळकर           

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: पान
« Reply #1 on: June 24, 2013, 03:07:11 PM »
sampura panancha mahimach lihun kadhla ahes...
chaan...

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: पान
« Reply #2 on: June 24, 2013, 03:22:23 PM »
छान <<<<<
   पण वडाच्यापानांचे द्रोण-पत्रावळी नाही बनवत .त्यासाठी पळसाची पाने वापरतात

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: पान
« Reply #3 on: June 24, 2013, 04:43:10 PM »
vijaya....panancha far abhyas keleays vatat....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: पान
« Reply #4 on: June 24, 2013, 05:27:59 PM »
छान केली कविता कविता !आवडली !! :) :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: पान
« Reply #5 on: June 24, 2013, 10:30:33 PM »
mala aavadte kaviteche paan  :)