Author Topic: सायंकाळी सृष्टि मध्ये  (Read 709 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
सायंकाळी सृष्टि मध्ये
  लाली जरी दिसून येते
अंधार्या रात्री पूर्वीची
  तिच्या मध्ये नांदी दिसते
फुलवातीची ज्योत जेव्हां
  प्रज्वलित जास्त होते
दिवा जाण्या पूर्वीची ती
  अखेरची धडपड असते
सळसळ जेव्हां वायूची
  हळू हळू बंद होते
भीषण अश्या वादळाची
  ती पूर्व सूचना असते
माणसाचे मन जेव्हां
  मोठे अन उदार होते
कसल्या तरी स्वार्थाची
  ती पहिली पायरी असते

रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/blog-post.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: सायंकाळी सृष्टि मध्ये
« Reply #1 on: July 07, 2013, 11:06:16 AM »
nice poem :) sadhanaa :)

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: सायंकाळी सृष्टि मध्ये
« Reply #2 on: July 31, 2013, 05:34:28 PM »
Chhan kavita!congrats!!