Author Topic: तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा  (Read 732 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
खिडकीतून पाहताना त्याला मन मोहरून जात
त्याच्यासोबत भिजाव अस मनापासून वाटत
तो हि न चुकता येतो भेटायला
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा
 
बाहेर ये पटकन मिठीत  घायचं तुला अस ओरडून सांगतो
नाही आलीस तर मी आत येईन अशी धमकी पण देतो
घूमघूम करत वार्यासोबत बाहेरच घालतो पिंगा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा
 
खूप करतो विनवन्या मारतो खूप मस्का
त्याची मज्जा पाहत मी मात्र घेत बसते चहाच्या चुस्का
शेवटी येतो रडकुंडीला पडतो त्याचा चेहरा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा

आई येते किचनमधून अन खोलते खिडकी आरपार
व्हीलचेअर सरकवत बसते मी खिडकीच्या थोडी जवळपास
ओंझळीत घेता त्याला गगनाला भिडतो आनंद सारा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा

खुप खूप हसतो खूप गप्पा मारतो
अंगणात चल खेळायला हट्ट फार करतो
व्हीलचेअरला पाहून होतो निराश थोडा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा

हिरमुसून निघायची करतो तयारी
येतो अस सांगून उगाच मनाला  लावून जातो उभारी
डबडबत्या डोळ्यांनी घेतो निरोप माझा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा

मी मात्र व्हीलचेअरवर तशीच असते शांत
मन मात्र एकट्च खिडकी बाहेर खेळत असत
उद्या खरच येशील का? प्रश्न असतो डोळ्यात उभा
तू फक्त माझीच आहे रोजच असतो त्याचा दावा…....Shona   
 

 
 
  
 
 
 

« Last Edit: July 09, 2013, 05:01:46 PM by Shona1109 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
wah.......mastch ahe kavita  :)
avdali

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
छान कविता मनाला भिडणारी !

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
मनाला भिडणारी कविता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Shona,

छान .......
हृदयाला स्पर्शून गेली कविता .... :)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 312
व्वा-=-= चान कविता

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):