Author Topic: थेंब आणि थेंब  (Read 621 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
थेंब आणि थेंब
« on: July 12, 2013, 10:30:57 AM »
थेंब आणि थेंब

थेंबांची रांगोळी
काढी भुईवर
आला जोडी वारा
किती अनावर

थेंबांचा कशिदा
सुबकसा पानी
ऐने लावलेसे
लक्ष लक्ष रानी

थेंब शेतामधी
पडे रातदिनी
कणसाचे मोती
मधोमध पानी

थेंब रुजतसे
रोपाच्या मुळाशी
फुल सजतसे
नाजुक डोईशी

थेंब वहातसे
नदी नाल्यातून
करुणा देवाची
दोही नेत्रातून ...


-shashaank purandare.
« Last Edit: July 12, 2013, 10:31:54 AM by shashaank »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: थेंब आणि थेंब
« Reply #1 on: July 12, 2013, 11:13:05 AM »
va
 

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: थेंब आणि थेंब
« Reply #2 on: July 12, 2013, 03:29:15 PM »
करुणा देवाची 
  दोही नेत्रातून ......

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: थेंब आणि थेंब
« Reply #3 on: July 12, 2013, 03:31:21 PM »
छान! थेंबाची रांगोळी आवडली  :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: थेंब आणि थेंब
« Reply #4 on: July 12, 2013, 04:15:45 PM »
थेंब रुजतसे
रोपाच्या मुळाशी
फुल सजतसे
नाजुक डोईशी ...

shashaank,
फारच छान.... :)