Author Topic: शोध  (Read 542 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
शोध
« on: July 12, 2013, 04:01:39 PM »
तो एक क्षण …. पूर्ण असूनही अधुराच
तुझ्या डोळ्यात स्वतःला पाहता पाहता कापुरासारखा भुर्रुकन उडून गेला
जाताना स्वतःची नवी ओळख घडवून गेला
पहिल्यांदाच अशी इतकी खोल गेली होती
झाडांच्या मुळांसारखी स्वतःलाच शोधत
आतापर्यंतची "मी" आणि ह्या आताच्या क्षणाला असलेली "मी"
किती भिन्न रूपे … माझीच …. ?
नजरेला नजर भिडवण किती कठीण वाटायचं मला
मग त्याच्यात स्वतःला विरघळन तर दूरच राहील
कधी जाणून पण नाही घेतल कसली भीती वाटायची ती …
त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि …. त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची…. माहित नाही
पण तुझ्या डोळ्यात स्वतःला निरखताना एक वेगळीच शांतता वाटली
तिथे सूर्याची प्रखरता नव्हती … होत ते फक्त पौर्णिमेच शीतल चांदणं ….
निश्चिंतपणे हरवावं इतक नितळ
हरवण पण कसलं …. स्वतःचाच शोध घ्यायची एक नवी वाटचाल  भेटावी तसचं
तुझ्या डोळ्यात भटकताना नवीन वळण दिसलं
हो तेच वळण जिथे तुझी भेट झाली होती
अन आयुष्याला एक वेगळीच कलाटणी लागली
तशी जीवन गाडी तुझ्याकडे बेभान धावली
तू त्या क्षितिजासारखा …. जेवढ जवळ जाव तेवढच दूर पळणारा
नुसत वाट पाहायला लावणारा आणि दम लागेपर्यंत धावायला भाग पाडणारा
मी मात्र त्या क्षितिजाला गाठायला तत्पर होती
पण तुझ्या स्पर्शाने पूर्ववत भानावर आणलं
अन अंत न गाठताच वाटचाल तुझ्यापर्यंत येऊन थांबली
वाटल होत काही अंतरानंतर शोधाला अंत लाभेल  …. पण तस नसत
शोध कधी संपत नाही  आणि संपतो ते फक्त आपण..Shona

Marathi Kavita : मराठी कविता

शोध
« on: July 12, 2013, 04:01:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: शोध
« Reply #1 on: July 12, 2013, 04:05:09 PM »
त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि …. त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची…. माहित नाही ..............
           छान  लिहिलस !आपबिती ?? :)

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
Re: शोध
« Reply #2 on: July 12, 2013, 09:15:02 PM »
कधी जाणून पण नाही घेतल कसली भीती वाटायची ती …
त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि …. त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची…. माहित नाही


khup avdali hi line... :)

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 312
Re: शोध
« Reply #3 on: July 13, 2013, 08:02:15 AM »
            तू त्या क्षितीजा सारखा ......
    छान...

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: शोध
« Reply #4 on: July 16, 2013, 12:28:37 PM »
Thank you so much.... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):