Author Topic: मुलगी झाली म्हणून -------  (Read 4086 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
मुलगी झाली म्हणून -------
« on: July 15, 2013, 10:06:35 PM »

==========================
मुलगी झाली म्हणून -------
===========================
म्हणे तिला मुलगी झाली म्हणून
सासरच्या लोकांनी घरात घ्यायचं नाकारलं
मुलगी अन वडिलांनी खूप केले प्रयत्न
पण मुलगी झाल्यानं तिला गुन्हेगार ठरवलं

" मुलगी वाचवा हो " असा नारा देते सरकार
मुली कमी झाल्यानं समाजातही उडालाय हाहाकार
लग्नासाठी मुलींना आयात केलं जातंय
पैसे देऊन पोरांसाठी खरेदी केलं जातंय

मुलगा अन मुलगी यांना समान मानायला हवं
जे बाळं झालंय ते फक्त सुदृढ हवं
किती आनंद होतो नवीन बाळं जन्मल्यावर
मग काय फरक पडतो मुलगी असल्यावर

हल्ली मुलीही शिकून मोठ्या होतात
माहेर अन सासरच नावं मोठं करतात
तरी अशा घटना वारंवार घडत असतात
स्री वर अन्याय स्रीयाच करत रहातात

खंर तर विज्ञानाने काही गूपित नाही राहिलंय
स्री फक्त गर्भ वाढवते हे सगळ्यांना कळलंय
दोषच द्यायचा झाला तर तो पुरुषाला कां नाही देतं
तो चुकलाय म्हणून त्याला शिक्षा कां नाही देतं

स्री ची चूक नसतानाही तिला कां छळतात
स्रीयाच असे वागण्यात आघाडीवर असतात
कधी थांबतील अशा घटना काही कळत नाही
मुलगा अन मुलीतला भेद कधी संपेल की नाही .
---------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: मुलगी झाली म्हणून -------
« Reply #1 on: July 15, 2013, 10:24:42 PM »
फार गंभीर! या  विषयावर विचार करायला पाहिजे ,कमीत कमी आपल्यासारख्या so called सुशीक्षितानी तरी  :(

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: मुलगी झाली म्हणून -------
« Reply #2 on: July 16, 2013, 08:46:28 AM »
                ' अजन्मा '
  जन्मा येता म्हणती - लक्ष्मी आली घरा
  लक्ष्मी म्हणूनच स्वागत होते सासुरा

  मुलगी झाली दोष आईचा?
  अजन्मा ठरविली, दोष आईचा ?
  नाही तर --कायद्याच्या आईचा?
  ती दोष न माने दुहितेचा -कायद्याच्या दुहितेचा
 
  अमूल्य ठेवा देते हिताचा
  मान राखा आईचा --आईचा
  हात तिचा सौख्याचा
  कित्ता गिरवा मायेचा

  वसा घ्यावा महालक्ष्मीचा
  नाव नको 'अजन्मा 'नावाचा


                 विजया केळकर __


« Last Edit: July 16, 2013, 08:49:08 AM by vijaya kelkar »

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: मुलगी झाली म्हणून -------
« Reply #3 on: July 16, 2013, 12:37:38 PM »
khup chhan....kharach garaj vichar badalnyache tarach samaj badlel

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: मुलगी झाली म्हणून -------
« Reply #4 on: July 16, 2013, 03:22:55 PM »
खूप छान  विजया !! :)

Re: मुलगी झाली म्हणून -------
« Reply #5 on: July 17, 2013, 03:59:08 PM »
khupach chan... mulgi  hi  havich aayushyat mag ti  aaichya rupat aso kinva preyasi chya  rupat aso .....  aayushyat  prem  denare hyach wyakti  astat je adhar  aani prem  donhi niswarth detat ....