Author Topic: मुलींचं खानदान  (Read 566 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मुलींचं खानदान
« on: July 18, 2013, 10:16:10 AM »
मुलींचं खानदान
-------------------
बाप पक्का बेवडा
त्याच्याच धुंदीत जगणारा
नवऱ्याच्या अशा वागणुकीन
आई दुसऱ्या बरोबर पळून गेलेली
चार पोरं
मुलगा घेऊन गेली
तीन मुली अन बाप हेच कुटुंब
घरात अठरा विश्व दारिद्र
मोठी मुलगी हुशार
बुद्धीच्या जोरावर इंजिनियरिंग करतेय
दोन्ही हुशार लहान बहिणींच
शिकवणी घेऊन सारं काही बघतेय
मुली हुशार असल्याने पायावर उभ्या राहतील
तरी माझ्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलंय
यांच्या लग्नाच्या वेळी
खानदानचा विषय आडवा आला तर
अन त्यात या मुलींची काय चूक ?
अजून वेळ आहे या गोष्टीला
पण माझ्या मनात आता पासून धडकी भरलीय
मुलींचं खानदान पाहून
लग्न ठरविणाऱ्या समाज व्यवस्थे विषयी .
=============================
संजय एम निकुंभ , वसई ……………
{ कृपया हिला कविता नका समजू नाहीतर अशी कविता
असते कां अश्या प्रतिक्रिया येतील जे सत्य आहे ते मांडलंय }

Marathi Kavita : मराठी कविता