Author Topic: छमछम बारबालांची  (Read 579 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
छमछम बारबालांची
« on: July 18, 2013, 06:52:27 PM »
छमछम बारबालांची
------------------------
छमछम पावलं पुन्हा थिरकतील
डान्स बारच्या फ्लोअरवर
उताविळपणाने हार होण्याची
नामुष्की ओढवली सरकारवर
कायद्यानेच बाजू घेतल्याने
पावले वळतील बार वर
नोटांचा पाऊस पडेल
बार बालांच्या नृत्यावर
कामाचा बोजा वाढण्याची
वेळ आली पोलीसांवर
अंकुश ठेवणे कठीण जाईल
वाढण्याऱ्या गुन्हेगारीवर
सरकारी यंत्रणा अन पोलिसांचे
लक्ष राहील हप्त्यांवर
संगनमताने धंदा चालून
मुलींची अब्रू टांगेल वेशीवर
भ्रष्टाचाराची साथ येईल
काळ्या पैशाला ऊत येईल
तरुण पिढी बरबाद होईल
प्रत्येक नाक्या नाक्यावर
कोवळ्या कळ्या कुस्करल्या जातील
पैशाच्या ताकदीवर
आवर कसा कोण घालेलं
मोकाट सुटलेल्या वासनेवर
पोटासाठी असला धंदा
खापर फुटेल समाजावर
तोंड लपविण्याची वेळ येईल
कुठल्याही सरकारवर
स्वास्थ टिकवायचे समाजाचे तर
बंदी आणावी छमछमवर
कायदे करून घाव घालावा
सरकारने या डान्स बारवर .
-------------------------------------
श्री . संजय एम निकुंभ

दि . १ ७ . ७ . १ ३

Marathi Kavita : मराठी कविता