Author Topic: सोहळा धरित्रीचा  (Read 471 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
सोहळा धरित्रीचा
« on: July 21, 2013, 03:05:00 PM »
    सोहळा धरित्रीचा 
.
.
मेघाच्या रिमझिम सरीतुनी...
प्रभाकराची ती किरणे आली...
थेंब मोतियांचे  हे तनुवरी...
अन  सजुन  ही  धरा गेली...
.
.
प्रभातकालीच्या ऐश्या सोहळ्याला...
लक्ष्मी ही सरस्वतीसवेँ आली...
ऐश्वर्य अनं विद्येच्या त्या संगमाने...
तिन्ही लोके तव् मंगलमय झाली...
.
.
सप्तरंगांची उधळण करोनिया...
इंद्रधनुने मग हजेरी लावली...
शिव-शक्तिच्या त्या अध्यात्मास घेऊनिया...
पावन गंगा ती जटातुनी वाहीली...
.
.
अनोख्या ऐश्या त्या सोहळ्याला...
पंचमहाभुतांनी देणगी वाहीली...
परि अतृप्त त्या मानवाची...
मनाची झोळी मोकळीच राहीली...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: July 22, 2013, 06:52:56 PM by कवि - विजय सुर्यवंशी. »

Marathi Kavita : मराठी कविता