Author Topic: कमिशन ….  (Read 440 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कमिशन ….
« on: July 27, 2013, 11:07:16 PM »
कमिशन ….
===========
रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते
सगळीकडे हीच अवस्था आहे
पुन्हा पुन्हा त्याच ठेकेदारांना काम देणे
हेच तर राजकारण्यांना हवे आहे

३० टक्के कमिशन वाटलं जातं
त्यात ठेकेदार काय करणार
तो तर पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यांची
वाट लावायला तयारच असणार

कमिशन शिवाय कुणालाही ठेका
कुठल्याही महापालिकेत मिळत नाही
या राजकारण्यांना काय वाटतं
हे जनतेला माहित नाही

सगळं काही कळत असूनही
जनता काहीच करू शकत नाही
असा एखादा अपवाद असेल कां
ज्या नगरसेवकाचे हात बरबटलेले नाही

सगळ्या पक्षांचे नगरसेवक
मस्त वाटून लोणी खातात
लोक मात्र खड्यात पडून
आपला जीव गमावतात

हे असेच चालू आहे अन रहाणार
याला कुणीच थांबवू शकत नाही
कारण समाज कामाच्या नावानं
स्वतःची तुंबडी भरायची लत जाणार नाही

जर असेल कुणालाही लाज या प्रश्नाची
निधड्या छातीन या विरुद्ध बंड करावं
जनतेचा पैसा त्यांच्या कल्याणासाठी वापरून
लोकांच जगणं खऱ्या अर्थानं समृद्ध करावं .
--------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . २७ . ७ . १३   
         

Marathi Kavita : मराठी कविता