भास तो कालचा .. भास हा आजचा
का छळू लागला ... भास हा रोजचा ??
का तुझा पाहिला साजिरा चेहरा ?
राहिलो ना अता कामचा .. काजचा !!
चोरुनी पाहते, लाजते, हासते ..
मी दिवाणा तिच्या ह्याच अंदाजचा !!
काय देऊ तिला मी कुठे शाजहा ?
मी कसा द्यायचा तोहफा ताजचा ??
चुंबिला ना तिचा ओठ अद्याप मी
आड येतो तिचा घुंघटा लाजचा !!
काळजाची तिला भावना सांगतो ..
शब्द लाभो 'अभी' भरजरी बाजचा !!