Author Topic: दुखविल्यानंतर... गज़ल  (Read 1568 times)

Offline sumitchavan27

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Male
    • Marathi Kavita
दुखविल्यानंतर... गज़ल
« on: July 09, 2009, 03:28:55 PM »

अनावश्यक असे हा जन्म मित्रांनो
जगा माझ्यापरी थोडे पवित्रांनो

मला बोलावणी येती बिघडण्याची
तुम्ही लखलाभ तुम्हाला चरित्रांनो

मजा बरबाद होण्याची नका भोगू
बसा भिंतीवरी निर्जीव चित्रांनो

कुठे अमरत्व तुम्हाला तरी आहे?
कशाच्या काळज्या करता विचित्रांनो?

सुचे कविता मनाला दुखविल्यानंतर...
जपा सातत्य हे उर्जाजनित्रांनो

Marathi Kavita : मराठी कविता