Author Topic: कसं होईलं या देशाचं  (Read 532 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कसं होईलं या देशाचं
« on: August 06, 2013, 10:15:06 PM »
कसं होईलं या देशाचं  …………. संजय निकुंभ
==============
आज ५ जवान शहीद झाले
दोन दिवस ओरडतील chhanel वाले
विरोधक बोल लावतील कॉंग्रेसला
कॉंग्रेस खडे बोल सुनावेल पाकला

मागेही तीन सैनिकांचे
होते पाक सैन्याने मुंडके उडवले
काळाच्या ओघात सारे पक्ष
अन जनतेनेही ते विसरले

सरकार पैशाची भिक देईल सैनिकांच्या कुटुंबांना
पण आणू शकेल कां परत पुन्हा त्या जवानांना
त्यांच्या कुटुंबाचे अश्रू कुणीच पुसू शकणार नाही
उत्तर दिल्याशिवाय पाक गप्प बसणार नाही

पण सरकार अन मवाळ पंतप्रधानास
हे कदापीही शक्य होणार नाही
अन कुत्र्याच्या शेपटी सारखी पाकची
भ्याड हल्ला करण्याची वृत्ती जाणार नाही

सरकार अन विरोधक एकमेकांची
उणीदुणी काढत राहतील
पण एवढ्या गंभीर प्रश्नावरही
एकत्र कधीच येणार नाही

ते एकत्र येतात फक्त
आपलेच भले करायला
इतकं रान चरुनही पैशाच
आमदार अन खासदार यांचे भत्ते वाढवायला

या देशातल्या राजकारण्यान मध्येच
देशाला लुटायची स्पर्धा लागली आहे
जनता हवालदिल अन बेहाल होतेय
पोट भरण्याच्या भ्रान्तापोटी मरत चालली आहे .
------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . ६ . ८ . १३ 

Marathi Kavita : मराठी कविता