Author Topic: मानवाच्या दुःखाची ...  (Read 609 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मानवाच्या दुःखाची ...
« on: August 08, 2013, 02:03:53 AM »
मानवाच्या दुःखाची
अश्रूं ही वाट आहे
हृदयावरील दडपण
त्यामुळेच हटत आहे
नदीवरील बांध
पाणी जसा अडवितो
दाब जास्त झाल्यावर
चटकन फुटून जातो
धरणाच्या रक्षणासाठी
बांधाला दारे असतात
त्यावर दाब वाढल्यावर
ती उघडून दिली जातात
अशाच ह्या दारांमुळे
धरण सुरक्षित रहाते
नदीला आलेला पूर
अलगद सोडून देते
धरणाची दारे अन अश्रूं
ह्यांच्यात साम्य आहे
दाब नष्ट करणेच
दोन्हींचे काम आहे
अतीव दुःखाचा भार
तसांच मनांत राहील
मानवाचे शरीर तेव्हां
बांधासम कोसळून जाईल
दाब कमी करण्यासाठी
अश्रूंचे ते दार आहे
त्यामुळेच मानव आज
 दुःखातही जगत आहे
रविंद्र बेंद्रे
 कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_5.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: मानवाच्या दुःखाची ...
« Reply #1 on: August 08, 2013, 06:43:08 PM »
Apratim kavita Sadhanaji...