Author Topic: आजपर्यंत चंद्र..  (Read 466 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आजपर्यंत चंद्र..
« on: August 12, 2013, 01:23:48 AM »
आजपर्यंत चंद्र आम्ही
आकाशांत दूरवर पाहिला
कल्पना नसतानाही
मानवाने त्यावर पाय ठेवला

सौंदर्य त्याचे कायम आहे
औत्सुक्य मात्र गेले आहे
कारण मानवाने आतां
त्याची माहिती काढली आहे

ग्रह मंगळ भडक लाल
भिती सर्वां दाखवत होता
पत्रिकेत मंगळ असेल तर
त्याला कुणी वाली नव्हता

मंगळाची शान सुद्धा
आता कमी झाली आहे
अमेरिकेचे यान कारण
त्यावरही उतरले आहे

तेजस्वी शुक्र सायंतारा
अंबरी जो चमकतो आहे
त्यावरही मानवाने आतां
अतिक्रमण केले आहे

गूढता आता त्याचीही
पूर्णपणे कमी होईल
शुभ्रतेचे कारण त्याच्या
मानवाला समजून येईल

हळू हळूं विश्वाबद्दल
मानवास ज्ञान होत जाईल
त्याचे गूढ गेले तरी
सौंदर्य तसेच कायम राहिल
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_7.html

Marathi Kavita : मराठी कविता