Author Topic: ईक्षुदंड मी ईक्षुदंड  (Read 477 times)

ईक्षुदंड मी ईक्षुदंड
« on: August 12, 2013, 07:54:10 PM »
ईक्षुदंड मी ईक्षुदंड
देवाजीची कृपा मजवर उदंड
दिसतो जरी मी खंड-विखंड
उदरात जपतो मी माधुरी प्रचंड

बळीराजाने केली मशागत
काळ्या आईने जपले बाळागत
पाचुसारखी झाली हिरवीगार पाती
त्यावर जडवले दंवबिंदुचे मोती

वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलू लागलो
आकाशीच्या बापाबरोबर बोलू लागलो
हसत-बागडत उंचच उंच झालो
डोक्यावर तारुण्याचे तुरे मिरवू लागलो

हळू-हळू देह झाला कठीण बलदंड
मधुर रसाने भरलो अखंड
अग्निदिव्यास मी झालो तत्पर
कायाकल्प होवून झालो सुंदर

आता माझा मी न राहिलो
तुमच्या गुळ-साखरेत पुरता भुरलो

असा मी ऊस,असा मी ऊस – ईक्षुदंड ।

                    - श्रीमति प्रतिभा गुजराथी
« Last Edit: August 12, 2013, 07:58:16 PM by श्रीमति प्रतिभा गुजराथी »

Marathi Kavita : मराठी कविता