Author Topic: आठवणींच्या जखमांच दान  (Read 542 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
आठवणींच्या जखमांच दान
« on: August 14, 2013, 08:12:18 PM »
आठवणींच्या जखमांच दान
--------------------------------
जे क्षण आलेय वाट्यास
त्यांना भरभरून जगावं
जी काय जोडलेली नाती
त्यांच्यावर प्रेमाची मुक्त उधळणं करावं

कारण जे क्षण आज आहेत
ते उद्या भेटणार नाही
उद्या कदाचित आपल्याच
आयुष्यात असणार नाही

क्षणभंगूर हे आयुष्य
कां दु:खात घालवावं
प्रत्येक क्षण अनमोल जगण्याचा
सुख देत घेत जगावं

नाती , माणसं असतात तोवर पण
किंमत त्यांची कळत नसते
काळानं झडप घातल्यावर हाती
आठवणींच्या जखमांचं दान असते

भूतकाळ बदलवू शकत नाही
भविष्य जाणू शकत नाही
वर्तमानच माझा मानून
आयुष्य " बक्षिस " असल्यासारखं उपभोगावं .
---------------------------------------------
संजय एम निकुंभ ., वसई
दि. ३० . ६ . १३ वेळ : १० . १५

Marathi Kavita : मराठी कविता