Author Topic: सत्तेची धुंदी  (Read 574 times)

Offline vinod.patil.12177276

 • Newbie
 • *
 • Posts: 45
सत्तेची धुंदी
« on: August 15, 2013, 01:44:14 AM »
.....सत्तेची धुंदी ......


खुले बोलण्या सकळ जनांना बंदी आहे
रोज नवे ओकणा-या नेत्यांची चंदी आहे
.
.
देशाची ईमान राखण्यास वेळ कुठाय ?
जो-तो आपले भले करण्यास छंदी आहे
.
.
दीन दुबळ्या कष्ट क-यांना वालीच नाही
इथे भुकेची भाकरी लुटण्या संधी आहे
.
.
कसे जन्मलो पाप घेवून माणसांत मी
होय पुढा-यांत माणुसकीची मंदी आहे
.
.
नका टांगू वेशीवर लक्तरे लुटण्याची
स्वत: पोट भरण्यास जनता खंदी आहे
.
.
कसे सांगु दु:ख इथल्या नशीब चोरांना
नगारे पिटवणारा राजाच नंदी आहे
.
.
क्रांतीची मशाल पेटवू पुन्हा जिंकायला
मस्तवाल पुढा-यांना सत्तेची धुंदी आहे...
.
.
-विनोद पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता

सत्तेची धुंदी
« on: August 15, 2013, 01:44:14 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सत्तेची धुंदी
« Reply #1 on: August 17, 2013, 02:09:26 PM »
vinod.patil,

छान आहे गझल .....  :(

Offline vinod.patil.12177276

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: सत्तेची धुंदी
« Reply #2 on: August 19, 2013, 01:30:25 PM »
धन्यवाद  मिलिंदजी ,अगदी पहिला प्रयत्न ......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):