Author Topic: उमगते मन  (Read 511 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
उमगते मन
« on: August 15, 2013, 07:02:07 AM »
उमगते मन …………… संजय निकुंभ
===========

अदृश्य जरी मन हे असले
तरी पाहता ते येते
कधी स्वभावातून , कधी वागण्यातून 
ते बाहेर डोकावते

कितीही झाकले तरी
नजरेस ते पडत रहाते
हृदयाच्या खोल कप्प्यातले
मन उमगत रहाते

कितीही कुणास फसवले
मन कळत रहाते
जे मन आहे सुंदर
ते काळजात रहाते

म्हणून मनास करा सुंदर
तेच हृदयात रहाते
मिटला जरी हा देह
मन तो जिवंत ठेवते .
================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १५ . ८ . १३  वेळ : ६ . ३० स.   Marathi Kavita : मराठी कविता