Author Topic: रात्र माझी चोरतो ...  (Read 564 times)

Offline Omkarpb

  • Newbie
  • *
  • Posts: 42
  • Gender: Male
रात्र माझी चोरतो ...
« on: August 16, 2013, 09:35:34 PM »
रात्रीच्या चांदण्यात सुंदर असे काय असते,
सूर्याचे लोपणे चंद्राचे उगवणे यात नवीन काय असते ,
निद्रा ही एकच गोष्ट रात्री घेण्यासारखी असते,
पण ती सुद्धा काहीच सुखी जीवांना मिळते,
माझ्या शंकांना विचारांना काम करायला रात्रपाळीच सापडते,
अशीच एखादी गोष्ट रात्र माझी चोरते ........
कधी ती विशिष्ट व्यक्ती येते ,
डोळ्यात डोळे घालत पाहू लागते,
ओठांवरती मंद शांत हसू आणते,
केसांच्या बटा हलकेच मागे घेते,
आणि नकळत लाजून खाली पाहू लागते,
ती व्यक्ती ते लाजणं रात्र माझी चोरते ..........

कधी मी खूप खूप मागे जातो,
दप्तर फेकून तशाच शाळेच्या कपड्यात खेळायला जातो,
ते मळल्यावर आईचा धपाटाही खातो ,
त्यापासून वाचण्यासाठी आजीच्या खुर्ची मागे लपतो,
आणि रात्री गरम गरम आईच्या हातचे थालीपीठही खातो,
ते थालीपीठ तो धपाटा रात्र माझी चोरतो ..........
कधी मी गोल गोल तिथल्या तिथेच फिरत राहतो,
'आपण असंच का नाही केलं' हा एकच प्रश्न पडत राहतो,
कोनाड्यात मारून मुटकून ठेवलेल्या विषयाला हात लागतो,
मग तोच विषय डोक्यावर टपली मारत जागं ठेवतो,
मग उत्तराच्या पाठलागाचा खेळ सुरु होतो,
तो पश्चाताप तो विषय रात्र माझी चोरतो ...........


कधी भविष्यातला मी माझ्याशीच हस्तांदोलन करतो,
अगदी stylish पणे मला ओळख करून देतो,
 कुठल्याशा कंपनीत मोठ्या पदावरचा मी सहकाऱ्यांना order सोडतो,
पिकलेले केस आणि सुस्वरूप बायको सोबत फोटोही काढतो,
अगदी नातवंडानाही ह्या आजच्या वेड्या कवीच्या गोष्टी सांगतो,
तेव्हाचा मी तेव्हाचा प्रत्येकजण रात्र माझी चोरतो ..........
दिवसभर काम करून जीव थकलेला असतो,
'लवकर झोपू' हे उद्दिष्ट ठेवून लवकर उठलेला असतो,
कधीतरी केव्हातरी नकळत डोळा लागतो,
गादी उशी सारे शरीर हवेत विरून जाऊन ,
निद्रेच्या कुशीत आधीन होऊ लागतो,
मग तेव्हाच माझ्या जुन्या अमेरिकेतल्या मित्राचा भररात्री फोन येतो,
'काय साल्या, झोपलायस का ?' म्हणून विचारतो,
मी 'नाही रे' म्हणत डोळे चोळतो ,
ते नशीब तो फोन रात्र माझी चोरतो ...... रात्र माझी चोरतो ।


- ओंकार
« Last Edit: September 15, 2013, 11:21:04 AM by Omkarpb »

Marathi Kavita : मराठी कविता