Author Topic: बॉस रिटायर होतांना  (Read 720 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
बॉस रिटायर होतांना
« on: August 17, 2013, 11:13:21 PM »
हळू हळू वाढवलेल्या 
आपल्या साम्राज्यातून
होवून रिटायर   
जाणार आता सरकार
नाही म्हटले तरी
त्यांना दु:ख हे होणारच 
पण सरकार ते मुळीच 
नाही दाखवणार
तसे त्यांनी इथे
भरपूर काम केले आहे
भरपूर कमावले अन
भरपूर उपभोगले आहे
अयोग्य किती योग्य
काळे किती गोरे
खोटे किती खरे
सारे त्यांनाच माहित आहे
पण ज्या साम्राज्याची
उभारणी त्यांनी केली
त्याला हे जग सदैव
लक्षात ठेवणार आहे
त्यांच्या जाण्याने सुख नाही
दु:ख तर मुळीच नाही
एक गेला कि दुसरा येणार
राज्य तसेच चालू राहणार
सारे चाकर पुन्हा नवा
एक जयजयकार करणार


विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:58:40 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता