Author Topic: खोटारडा पाऊस  (Read 616 times)

Offline Mrs. Sanjivani S. Bhatkar

  • Newbie
  • *
  • Posts: 30
खोटारडा पाऊस
« on: August 20, 2013, 04:36:59 PM »
खोटारडा पाऊस


पावसा रे पावसा
किती आहेस खोटा?
केलास न रे आमचा  तोटा
येतो म्हणतो आणि येताच नाही
सर्वजण टेबलाखालून घेतात नोटा
तू तर वरच्यावर घेतो नोटा
पण करशील न रे पाणी पुरवठा
पावसा रे पावसा
किती आहेस खोटा?
तुझी खूप पहिली  वाट
गाढवाच्या लग्नात आणि बेडकाच्या लग्नात
का फिरवलीस आमच्याकडे पाट
तुझा  असतो नेहमीच थाट
आलास तरी लावतो वाट
न आलास तरी लावतो वाट
पावसा रे पावसा
किती आहेस खोटा?
अरे सांग न रे पावसा
तुज गुपित आहे तरी काय
अजून किती दिवस रडवणार
कि नेहमी सारखा फसवणार
मला मात्र काहीतरी सुचवणार ……

 - सौ संजीवनी संजय भाटकर

Marathi Kavita : मराठी कविता