Author Topic: माझ्या आईचा लाडका आहे मी.....  (Read 780 times)

मी नसेल राजकुमार कुणासाठी,
पण ???
स्वतःच्या मनाचा राजा आहे मी.....

मी नसेल ह्रदयात कुणाच्या,
पण ???
माझ्या आपल्यांच्या मनात आहे मी.....

मी नसेल ओठावर कुणाच्या,
पण ???
विसरता न येणारे गाणे आहे मी.....

मी नसेल आयुष्यात स्पेशल कुणाच्या,
पण ???
माझाचं आवडता आहे मी.....

मी नसेल आठवणीत कुणाच्या,
पण ???
कधीचं न थांबणारा क्षण आहे मी.....

मी नसेल शब्दात कुणाच्या,
पण ???
कधीचं न सुटणारे कोडे आहे मी.....

मी नसेल विचारात कुणाच्या,
पण ???
डोक्यातून न जाणारे अनुभवी बोल आहे मी.....

कारण ???

मी कुणाला आवडो किँवा नावडो,
माझ्या आईचा लाडका आहे मी.....

माझ्या आईचा लाडका आहे मी.....

_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....