Author Topic: अंत पाहतो तू देवा .....  (Read 877 times)

अंत पाहतो तू देवा .....
« on: August 30, 2013, 11:50:36 AM »
तुझी  बासरी  प्रेमाची
मी भुकेली  त्या स्वरांची

तुझ्या एका भेटीची
तुझ्या चरणस्पर्शाची ................

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ....

डोळे  थकले जरी वाट  पाहुनी
आस  आहे तुझ्या दर्शनाची ..........

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........

तुटतो  रे देवा  विश्वासही आता
गरज  आहे  एका चमत्काराची ............

तहानलेल्या जीवांना ह्या
तहान  आहे  तुझ्या कृपेची ...............

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........

हात  थकले
पाय ही दमले
श्वासही सुटतो देवा
अंत  पाहतो तुही  ह्या गरीबाची ............

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........
-
©प्रशांत डी शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: अंत पाहतो तू देवा .....
« Reply #1 on: August 31, 2013, 12:48:21 AM »
chan kavita

Re: अंत पाहतो तू देवा .....
« Reply #2 on: September 03, 2013, 10:36:21 AM »